आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराQ. कार्डिओमायोपॅथीसाठी शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे का? A. हा हृदयाच्या स्नायूचा आनुवंशिक आजार आहे, तो जन्मानंतर किंवा पालकांकडून केव्हाही होतो, त्यामुळे हृदय शरीरात योग्यरीत्या रक्त पंप करू शकत नाही. यामुळे हृदय काम करणे थांबवू शकते. त्याचा उपचार म्हणजे औषधे, प्रत्यारोपणाची उपकरणे, शस्त्रक्रिया आणि गंभीर प्रकरणांमध्ये केवळ प्रत्यारोपण. Q. छातीच्या डाव्या बाजूला वेदना होतात. याच्या सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. असे का? A. हृदयाची तपासणी सामान्य असल्यास त्याचे कारण स्नायू किंवा हाडांचे दुखणे असू शकते. Q. माझी आई ३५ वर्षांची आहे. तिच्या हृदयात छिद्र आढळून आले. यावर इलाज काय? A. या वयात अॅट्रियल सेप्टल दोष होण्याची शक्यता जास्त असते. व्हेंट्रिक्युलर सेप्टल दोषदेखील होऊ शकतो, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते काही तपासणी करून ऑपरेशन कधी करायचे ते सांगतील. Q. माझे वय ६८ वर्षे आहे. गेली १५ वर्षे मी नियमित बीपी व शुगरची औषधे घेतो. प्रत्येक वेळी चाचणी सामान्य येते. ही औषधे बंद करू का? A. तुमचे रिपोर्ट््स नॉर्मल असले तरी औषध बंद करू नका, ते नियमित घेत राहा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. Q. मधुमेह आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का? A. मधुमेही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी जास्त असतो. Q. औषधाने २० ते ३०% ब्लाॅकेज दूर करता येतात का? A. २० ते ३०% ब्लॉकेज असेल तर ऑपरेशन वा अँजिओप्लास्टीची गरज नाही. औषध आणि दिनचर्येमधील बदल हे वाढण्यापासून रोखू शकतात. Q. रक्तातील ब्लाॅकेज जाणून घेण्यासाठी कोणत्या प्रकारची अँजिओग्राफी करावी? A. कोरोनरी रोहिणीतील अडथळ्यासाठी कोरोनरी अँजिओग्राफी वा सीटी अँजिओग्राफी करता येते.
डॉ. वसीम सचोरा एमडी, केडी हॉस्पिटल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.