आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मधुमेही तरुणाने बनवला अनोखा ‘इन्सुलिन पॉट’; नकुलच्या संशोधनाचा हजारो मधुमेहींना फायदा, फ्रिजची गरज नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुमेहींना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते. ते घेणे जितके गरजेचे असते तितकेच ते २८ अंश तापमानाखाली जतन करणे आवश्यक असते. मात्र, सर्वच रुग्णांकडे फ्रिजची सोय नसते. त्यांच्यासाठी स्वत: मधुमेही रुग्ण असलेल्या वीस वर्षीय नकुल तिवारी याने अवघ्या ६०० रुपयांत इन्सुलिन ठेवण्यासाठीचे अनोखे उपकरण बनवले आहे.

डॉ. अर्चना सारडा यांच्या उडान संस्थेत बालमधुमेहींना स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याचे धडे दिले जातात. उन्हाळ्यात इन्सुलिनचे तापमान योग्य राखणे गरजेचे असते. त्यामुळे उडानच्या मुलांनी एक भांडे तयार केले. मातीच्या भांड्यात माती किंवा वाळू भरून त्यात आणखी एक भांडे ठेवून त्यामध्ये इन्सुलिन ठेवल्यास तापमान २८ अंशाखाली स्थिर राहते.

मात्र, या भांड्यात दर तासाने पाणी टाकावे लागते. औरंगाबादचा नकुल शिक्षणासाठी नाशिकला गेला तेव्हा हॉस्टेलवर दर चार तासांनी भांड्यात पाणी घालणे शक्य नव्हते. शिवाय फ्रिजही नव्हते. इन्सुलिन योग्य तापमानात न ठेवल्यास ते निरुपयोगी होण्याचा धोका होता.

याविषयी नकुलने त्याचा मित्र रामेश्वर खामगावकर आणि श्रेयस राजपूत यांच्याशी चर्चा केली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या नकुलने भांड्याचे तापमान कमी ठेवण्यासाठी एक शोध लावला. त्याला महाविद्यालयातील प्रा. प्रवीण नवाथे, प्रा. शिवानी क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...