आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगर चांगले शहर:बदली मागितली नाही, ती थांबवण्यासाठी कुठले प्रयत्नही केले नाहीत- आयुक्त डॉ. अभिजित चौधरी

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रजेवर असताना बदली झाल्यानंतर महापालिकेचे मावळते आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी शहरात दाखल झाले आहेत. आपल्या बदलीचे संकेत होते, आपण मागितली नव्हती आणि थांबवण्यासाठीही प्रयत्न केले नाहीत, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

पालिकेच्या ९ महिन्यांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे काम केले. १ हजार कोटींची विकासकामे मार्गी लावली असून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही काळ थांबण्याची इच्छा होती, असेही ते म्हणाले. जीएसटी सहआयुक्तपदी ते रुजू होत आहेत.

डॉ. चौधरी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर हे शहर खूप चांगले आहे. येथे काम करण्यासाठीही बराच वाव असून नागरिकांचे प्रेम आणि सहकार्य मिळाले आहे.जी-२० च्या निमित्ताने महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी किती जीव ओतून काम करतात याचा प्रत्यय आला. मनपात कर्मचारी भरती प्रक्रिया राबवणे खूप आवश्यक आहे तसेच शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आणखी अधिकारी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सातारा-देवळाईत ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी २७५.६८ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली.

ही कामे झाल्याने व्यक्त केले समाधान

  • १०० कोटींचे रस्ते सुरू होतील.
  • कमल तलावाचे सौंदर्यीकरण.
  • जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी १९३ कोटींची निविदाही अंतिम टप्प्यात पोहोचली.
  • स्मार्ट सिटीतील १०० कोटींची दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत.
  • ई-गव्हर्नन्समधील विविध कामे पाइपलाइनमध्ये होती.