आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा शिक्षक पुरस्कारात केवळ 2 महिला:शिक्षण विभागाला आदर्श शिक्षिका दिसल्या नाही का? शिक्षकांनी उपस्थित केला प्रश्न

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे शिक्षकांच्या कामाला योग्य तो न्याय मिळतो आणि इतरांना काम करण्यासाठी प्रेरित केले जाते. जिल्ह्यामध्ये 45 ते 50 टक्के महिला शिक्षिका असून जाहीर झालेल्या 22 शिक्षक पुरस्कारांमध्ये मात्र दोन महिला शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण विभागाला आदर्श शिक्षिका दिसल्या नाही का? की यावर्षी देखील नेहमीप्रमाणे शिफारशी नुसारच पुरस्कार देण्यात आले आहे? आदी प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहे.

प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे. शिक्षण क्षेत्रात देखील महिला मागे नाही, जिल्हातील आदर्श शिक्षक पुरस्कार निवडताना देखील परीक्षण समितीमध्ये बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी अशा तीन महिला सदस्य असताना निवडण्यात आलेल्या 9 प्राथमिक, 7 माध्यमिक, 1 विशेष शिक्षक मानकरी तर 5 शिक्षकांना विशेष पुरस्कारामध्ये सातारा जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिकच्या एक आणि माध्यमिकच्या एक शिक्षिकेची निवड करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या मंत्री मंडळाप्रमाणे शिक्षण विभागालाही महिलांचे वावडे आहे का ? असा प्रश्न शिक्षण वर्तुळात उपस्थित होत आहे. या निवडीबाबत अनेक शिक्षकांनी शंका उपस्थित केली असून नेहमीप्रमाणे यावर्षी देखील शिफारशी नुसार निवड करण्यात आली असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

प्रस्तावांमधूनच निवड

जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटणे म्हणाले की, शिक्षकांच्या पुस्कारासाठी प्रास्तव मागविण्यात येतात. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांच्या छाननीतूनच निवड केली होते. शिवाय परीक्षण समितीमध्ये बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या, शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी अशा तीन महिला असल्यामुळे स्त्री शिक्षकांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने झाले आहे

शिक्षक भारतीचे महेंद्र बारवाल म्हणाले की, औरंगाबाद, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद तालुक्यात 60 % महिला शिक्षक कार्यरत आहे तर उर्वरित तालुक्यामध्ये देखील 40 टक्क्यापेक्षा जास्त महिला आहे. प्रत्येक तालुक्यातून एक महिला, एक पुरुष असे दोन पुरस्कार दिल्यास सर्वाना न्याय मिळाला असता.

बातम्या आणखी आहेत...