आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मराठवाड्यात कोरोनाच्या आकड्यांचा घोळ; शासनाच्या कोविड पोर्टलवरील अन् जिल्हास्तरावरील माहितीत तफावत

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य यंत्रणेवर येणाऱ्या ताणामुळे एकीकडे आरोग्यसेवा देणे व दुसरीकडे दररोजची माहिती ऑनलाइन वेळेत भरण्याचे काम करावे लागत आहे

मराठवाड्यात शासनाच्या कोविड पोर्टलवरील माहिती अन् जिल्हास्तरावरून भरल्या जाणाऱ्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्यसेवेचे नियोजन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर केवळ डाटा भरण्याबाबत पर्यवेक्षणासाठी उपजिल्हाधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. मराठवाड्यात मागील १५ ते २० दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला असून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे यासंदर्भात वारंवार आवाहन करूनदेखील अनेक ठिकाणी प्रशासनाच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचाच परिणाम रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

दरम्यान, आरोग्य यंत्रणेवर येणाऱ्या ताणामुळे एकीकडे आरोग्यसेवा देणे व दुसरीकडे दररोजची माहिती ऑनलाइन वेळेत भरण्याचे काम आरोग्य यंत्रणेला करावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरण्यामध्ये मोठी तफावत आढळून येते. पोर्टलवरील माहिती व जिल्हास्तरावरून भरलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून येऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्यसेवेचे नियोजन बिघडत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने २५ मार्च व २७ मार्च रोजी भरण्यात आलेल्या माहितीची तपासणी केली असता त्यात तफावत आढळली आहे.

अपडेटच्या सूचना दिल्या
माहिती केंद्र व राज्य शासनाला पाठवावी लागते. या माहितीवरच स्थानिक पातळीवर नियोजन केले जाते. त्यामुळे सदर माहिती अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रत्येक जिल्ह्याला माहिती अपडेट करण्यासाठी उपजिल्हाधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जगदीश मणियार, उपायुक्त.

राज्याचा अहवाल जिल्हा अहवाल
जिल्हा नमुने पॉझिटिव्ह नमुने पॉझिटिव्ह
औरंगाबाद ३४६३ १८३६ ६२१५ १७०२
जालना १२३१ ३४४ ३७३१ ४५०
परभणी २७५५ ४४१ १५३१ ३४१
हिंगोली १०३ ३२ ९८८ १३९
नांदेड ४८१७ १४३१ ४०७० ११४९
बीड २२०८ ३३३ २०५६ २९९
लातूर २३१२ ४१५ ३५८८ ५२५
उस्मानाबाद ५८१ १६७ १२४३ १६५

बातम्या आणखी आहेत...