आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती रखडली:भारतात 2 वर्षांपासून अमेरिकेचा स्थायी राजदूत नसल्याने अडचणी ; अनेक मुद्द्यांवरून संघर्ष

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अमेरिकेचा स्थायी राजदूत नेमण्यात आलेला नाही. दिल्लीतील अमेरिकन राजदूत कार्यालयाची दोन वर्षांपासून ही स्थिती आहे. एवढ्या वर्षांत असे पहिल्यांदाच घडले आहे. तसे तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या वर्षीच लॉस एंजिल्सचे महापौर एरिक गार्सेटी यांची या पदावरील नियुक्तीला मंजुरी दिली होती. परंतु या प्रस्तावाला रिपब्लिकन पार्टीच्या दोन खासदारांनी आक्षेप घेतल्यानंतर तो रखडला होता. गार्सेटी बायडेन यांचे निकटवर्तीय मित्र तर आहेत, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणात हिंदी आणि उर्दूही शिकले आहे. अमेरिकेला भारत किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करणारी ही नियुक्ती असल्याचे अनेक तज्ज्ञांना वाटत होते. कारण सिनेटमध्ये या प्रस्तावाला खोडा घालण्यात आला. आता मध्यावधीत सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सला बहुमत मिळाल्याने गार्सेटी यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तज्ज्ञ दैनिक भास्करला म्हणाले, भारतासारख्या महत्त्वाच्या देशात राजदूताची नियुक्ती नसल्याचा परिणाम द्विपक्षीय संबंधावर होऊ शकतो.

यातून अमेरिकेच्या क्षेत्रीय हितसंबंधालादेखील धक्का बसू शकतो. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत केनेथ जस्टर ‘भास्कर’ला म्हणाले, राजदूताच्या नियुक्तीत विलंब योग्य नाही. राजदूत पस्थानिक दृष्टिकोनातून दोन्ही देशांतील मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी मदत करतो. संबंध सध्या चांगल्या स्थितीत आहेत, परंतु राजदूत नसल्यास मुद्दे अडकून पडू शकतात. राजदूत नसल्यास अडचणी येतात. त्यांनी गार्सेटी यांच्या नियुक्तीचे समर्थन केले. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील सिगुर सेंटर फॉर एशियन स्टडीजच्या प्रोफेसर दीपा आेलापल्ली म्हणाल्या, परस्परांतील रणनीती तसेच भूराजकीय हितसंबंधासाठी राजदूत आवश्यक आहे.

वास्तविक अमेरिकेचे सर्व मोठ्या देशात राजदूत तैनात आहेत. यात जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशात अमेरिकेचे राजदूत आहेत. मग भारतासारख्या देशात राजदूत नसणे ही मोठी चूक ठरते. चीनच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारतात स्थायी राजदूत हवा. अलीकडेच अमेरिकेने पाचवा अस्थायी राजदूत नेमला. अस्थायी राजदूत नसल्याने भारत-अमेरिका संबंधासाठी हा काळ अतिशय उलथापालथीचा ठरला. अमेरिकन खासदार रो खन्ना यांनीही भारतात स्थायी राजदूत नियुक्ती काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. रशिया-युक्रेन, पाकिस्तानशी संरक्षण करारासारख्या मुद्द्यांवर भारत-अमेरिकेत संघर्ष दिसला.

अमेरिकेचे ५० देशांत स्थायी राजदूत नाहीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयीन सूत्रानुसार सिनेटच्या परदेश संबंध समितीने एकमताने गार्सेटी यांची निवड केली आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेल्या नावांना सिनेटमध्ये मंजुरी न मिळण्यास राजकीय अनास्था कारणीभूत असल्याचे राजकीय तज्ज्ञांना वाटते. सौदी अरेबिया, कुवेत, यूएईसह ५० देशांत अमेरिकेचे स्थायी राजदूत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...