आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक अभियोग्यता परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी अवघे एक दिवस शिल्लक राहिला आहे. ही मुदत ८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. मात्र, संकेतस्थळावरील अडचणी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अर्ज भरताना अनेक अडचणी येत असून, उमेदवार गोंधळून जात आहेत. त्यामुळे शासनाने या अडचणी सोडवून अर्जाची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्तांकडे ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.
अभियोग्यता चाचणीसाठीचे वेळापत्रक ३१ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले, तर ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठीची मुदत दिली. परंतु, हे अर्ज भरताना अनेक चुका होत आहेत. तसेच, ९५० रुपये परीक्षा फी दोन वेळा भरावी लागते. तसेच, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढताना विद्यार्थ्यांना माेठी कसरत करावी लागत आहे. याचा ६० टक्के उमेदवारांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. सध्या उमेदवारांना परीक्षा अभ्यास सोडून कागदपत्रातील जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. साठ टक्के उमेदवारांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
भावी शिक्षकांना मानसिक, आर्थिक भुर्दंड अभियोग्यता परीक्षांचा अर्ज भरताना उमेदवार गोंधळून गेले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भावी शिक्षकांना मानसिक आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परीक्षेसाठी अतिशय कमी वेळ दिलेला असून, परीक्षार्थींमध्ये सरकारविरोधात रोष वाढत आहे. -संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष डीटीएड स्टुडंट असोसिएशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.