आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Tools for Education" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक २२ व २३ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये सकाळी १०.०० ते ११:३० या वेळेत करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. या अंतर्गत प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण १७,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या शाळा सुरु करण्यात आलेल्या असल्या तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा यशस्वी व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा या दृष्टीने SCERT, Maharashtra, पुणे यांच्या YouTube चॅनेल च्या माध्यमातून दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद चे अधिव्याख्याता तथा आय.टी. विभागाचे विभागप्रमुख श्री नारायण पडुळ, विषय सहायक श्री भालचंद्र ताटे आणि प्रमोद झिरपे यांनी केले आहे.
सदर दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारमध्ये गुगल मीट, गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स्, गुगल शीटस, गुगल स्लाईडस, गुगल क्लासरूम आणि यूट्युब लाईव्ह स्ट्रीम कॅपॅबिलिटी इ.घटकांचा समावेश असेल तसेच वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रथमतः सर्व शिक्षकांनी https://tinyurl.com/y5ozz209 या लिंकवर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केल्यावरच संबंधित शिक्षकास वेबिनारची लिंक SMS द्वारे प्राप्त होईल.डॉ. कलीमोद्दीन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.