आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली सभेत दिलीप धारूरकरांच्या आठणीत सभागृह गहिवरले:त्यांना माणसं जोडण्याची कला अवगत होती - विजय पुराणिक

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिलीपराव धारूरकर यांना माणसं जोडण्याची कला अवगत होती. समविचारी लोकांप्रमाणेच अन्य विचारधारेच्या माणसांनाही त्यांनी आपले चांगले मित्र बनवले होते. असे प्रतिपादन सेवा भारतीचे राष्ट्रीय सहसंयोजक विजयराव पुराणिक यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती आयुक्त, दै. तरुण भारतचे संपादक, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ते 'दिलीप धारूरकर यांचे 1 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने महसूल प्रबोधनी येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने, राजकीय क्षेत्रातील सहकारी, मित्र परिवार, संघराष्ट्रीय परिवारातील सहकारी, शासकीय सेवेत असतानाचे सहकारी तसेच अन्य आप्तेष्टांनी दिलीपरावांच्या स्मरणीय आठवणींना उजाळा देऊन शब्दरूपाने श्रद्धांजली अर्पण केली.

विजयराव पुराणिक म्हणाले, दिलीपरावांना माणसं जोडण्याची कला अवगत होती. आपल्याकडे जे काही आहे ते सहज राष्ट्रीय विचारासाठी उपलब्ध करून देणे हे दिलीपरावांनी केलं. माहिती आयुक्त असताना प्रतिकूल अश्या करोना संकट काळात ऑक्सिजन लावून त्यांनी केसेस मार्गी लावल्या.

दिलीपराव हे धनासक्त नव्हते, ज्ञानासक्त होते

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी दिलीपराव हे ज्ञानासक्त होते, उर्जादायी व्यक्तित्व होते, त्यांचे अचानक जाणे म्हणजे मोठं नुकसान आहे. बातमी कशी असावी, कशी शोधावी, कशी लिहावी याविषयी मार्गदर्शन करणार त्यांच्या इतका चांगला शिक्षक उपलब्ध होणं ही भाग्याची बाब होती. पत्ररूप शोक संदेश राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य आदींनी पाठवले.

व्हिडीओ च्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी दिलीपराव धारूरकर यांची दुःखद वार्ता मनाला धक्का देणारी होती असे शोकसभेत बोलताना सांगितले. देशहित व राष्ट्रवादाच्या विचारावर आधारित दिलीपरावांचे जीवन होते. समर्पित कार्यकर्ते होते. निर्भीड पत्रकार म्हणून लोकशाहीच्या यशस्वीतेकरिता त्यांची कमिटमेंट होती. त्यांचे विचार, लेखन आणि कर्तृत्व अमर व सदैव प्रेरणादायी राहील. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यानी दिलीपराव यांचं कर्तृत्व बहुआयामी होतं. तरुण भारतचे संपादक असताना त्यांच्या अग्रलेखांचा मोठा वाचकवर्ग निर्माण झाला होता. राष्ट्रविरोधी विषयांचा ते आपल्या प्रहार या सदरातून यथोचित समाचार घेत. दिलीपरावांचे अचानक निघून जाणे फारच वेदनादायी आहे असे सांगिताले.यासोबतच सुधाकर दानवे, अरुण समुद्रे, रत्नाकर कुलकर्णी, सुरेश केसापूरकर, दत्ता जोशी, हरिभाऊ बागडे, सुधाकर बारगजे, रमेश पांडव, राजारामभाऊ मुळे आदी आप्तेष्ट व सहकाऱ्यांनी शब्दरूपाने आपल्या आठवणींना उजाळा देत दिलीपरावांना श्रद्धांजली अर्पण केली.

बातम्या आणखी आहेत...