आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जांबरगाव शिवारात १८ एकर भूखंडावर सर्व सुविधायुक्त खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती माेठ्या दिमाखात उभी राहिली अाहे. वैजापूर-गंगापूर तालुक्यातील पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर बाजारभाव उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्गालगत ५० कोटींची आर्थिक गुंतवणूक करून हा प्रकल्प साकारला आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन हजार लाेकांना रोजगारांची संधीदेखील प्राप्त होईल, अशी माहिती भाग्यादेय काॅटन अँड अँग्री मार्केटचे संस्थापक चेअरमन शांतीलाल पहाडे यांनी दिली.
या नवीन बाजार समितीमुळे शेतकऱ्यांना पिकवलेला शेतमालाला स्थानिक व्यापाऱ्यांत लिलावात स्पर्धा निर्माण होऊन माफक बाजारभाव मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नगर, नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत शेतमाल विक्रीला नेण्यासाठीचा हाेणारा वाहतूक खर्च टळणार असून वेळेची बचत या नवीन बाजार समितीमुळे हाेणार अाहे.
या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज २० हजार क्विंटल शेतमाल खरेदीची क्षमता अाहे. खरेदी केलेला शेतमाल साठवणुकीसाठी पाच हजार मेट्रिक टनाचे अद्ययावत गोदाम असल्याने मालाची आवक जास्त झाल्यास शेतकऱ्यांना माल घरी नेण्याची वेळ येणार नाही. शेतीमालास आवश्यक २० ते २५ सापेक्ष आर्द्रता असलेल्या कोल्ड स्टोअरेज (शीतगृह) येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही हंगामात शेतमाल सुस्थितीत येथे साठवून ठेवता येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.