आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षांचे स्वागत:कडाक्याच्या थंडीत 6 तासांमध्ये दिव्यांगांनी गाठले ‘कळसुबाई’

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवुर्जा प्रतिष्ठानने नुकतेच कडाक्याच्या थंडीत १११ दिव्यांगांना सोबत घेऊन ६ तासांत कळसुबाईचे शिखर गाठून नवीन वर्षांचे स्वागत केले. प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे पाटील म्हणाले की, २०१० पासून शिखर मोहीम राबवली. यंदाचे ११ वे वर्ष होते. १११ दिव्यांगांनी पायथ्याशी ३० तंबू ठोकून कडाक्याच्या थंडीत रात्र काढली. पहाटे ५ वाजता मुख्य शिखर सर करत १ जानेवारीला सकाळी नववर्षांचा जल्लोष केला. या वेळी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सुभाष सज्जन, डॉ. अनिल बारकुल, पारसचंद साकला, सतीश आळकुटे, काजल कांबळे, डॉ. पंचलिंग सोमनाथ यांना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार देण्यात आला. यात सहभागी दिव्यांग आणि प्रतिष्ठान स र्वांसाठी हा रोमांचक अनुभव होता.

बातम्या आणखी आहेत...