आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सीएसआर फंडातून शाळांचे निरजंतुकीकरण करा, शिक्षण समितीच्या बैठकीत शाळांना सुचना

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत झुम अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली बैठक - Divya Marathi
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत झुम अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली बैठक
  • नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात आरोग्याची काळजी घ्या, झुम अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक

कोरोनाचा प्रादुर्भा रोखण्यासाठी सर्व शाळांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून शाळांच्या इमारतींचे निरजंतुकीकरण करा आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात आरोग्य विषयक काळजी आणि दक्षता घेवून करण्यात यावी. अशा सूचना जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकारी  सूरजप्रसाद जयस्वाल, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश बलांडे तसेच शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांची शिक्षण समितीची बैठक पार पडली. कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करुन नका. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत झुम अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक पार पडली.

या बैठकीत विविध विषयांचर चर्चा करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या देशभरात लॉकडाऊन असून, शाळा-महाविद्यालांना सुटी देण्यात आली आहे. मात्र नव्या शैक्षणिक सत्राची तयारी, शाळा प्रवेेशोत्सव आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया बाकी होणे बाकी आहे. पुढील काळात आरोग्याची सुरक्षिता लक्षात घेता शाळांमध्ये असणारी मोठी विद्यार्थी संख्या हा देखील काळजीचा विषय आहे. त्या अनुषंगोन या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांना देखील काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने सर्व शाळांमध्ये शिल्लक असलेला धान्य साठा सोमवार दि. 13 एप्रिल पर्यंत सर्व विद्यार्थी पालकांना वाटप करण्यात यावा असे आदेश देण्यात आले असून, पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात, आरोग्य विषयक काळजी व दक्षता घेवून करण्यात यावी. अवकाळी पाऊस व वादळामुळे नुकसान झालेल्या शाळा, इमारतीचा अहवाल सादर करावा. याबरोबरच जिल्हा परिषद उपकर अथवा सीएसआर मधून शाळा इमारतीचे नीरजंतुकीकरण करण्यात यावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची अंमलबजाणी प्रभावीपणे करावी असे जयस्वाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...