आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फुटाने उघडले:56 हजार क्यूसेक विसर्ग; पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून सध्या 56 हजार 592 क्यूसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीचे 18 दरवाजे दुपारी दोन वाजता तीन फुटाने उघडले आहेत. पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यावर्षी जायकवाडी धरण जुलै महिन्यात भरले होते. 31 वर्षानंतर पहिल्यांदाच धरण जुलै महिन्यात भरले आहे. जुलै महिन्यात जायकवाडी चे दरवाजे उघडले तेव्हापासून सातत्याने जायकवाडी मधून विसर्ग सूरू आहे.

असा आहे विसर्ग

जायकवाडी धरणात सध्या 48 हजार 334 क्यूसेक इतकी आवक येत आहे. यामध्ये नांदूर मधमेश्वर मधून 34425 क्यूसेक इतका विसर्ग केला जात आहे. तर देवगड बंधारा 3405 क्यूसेक गंगापूर धरणातून 2546 क्यूसेक तर होळकर ब्रीज इथून 7204 क्यूसेक इतका विसर्ग केला जात आहे.

असा आहे जलसाठा

पालखेड धरणातून 8470 क्यूसेक विसर्ग केला जात आहे. जायकवाडी धरणात 97 टक्के पाणीसाठा सध्या 2123 दलघमी इतका इतका आहे. तर एकूण पाणीसाठा 2681 दलघमी इतका आहे.हे प्रमाण 97.80टक्के इतका आहे.

पावसाचा इशारा

जायकवाडी धरण गेल्या चार वर्षांपासून सातत्याने भरत आहे. हवामान विभागाच्या वतीने आगामी काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे देखील जायकवडीच्या पाणीसाठा मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हा विसर्ग कायम वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...