आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबवावी, असे निर्देश महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. औरंगाबाद ग्रामीण विभाग-१ व २ तसेच कन्नड विभागातील ८०० अभियंते व जनमित्रांशी मुख्य अभियंता तालेवार यांनी नुकताच औरंगाबाद, वैजापूर व कन्नड येथे विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी तालेवार म्हणाले की, ग्राहकांना गतिमान सेवा व सुरळीत विद्युतपुरवठा करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.
त्याबरोबरच वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे. महावितरण ही ‘ना नफा’ तत्त्वावर काम करणारी सार्वजनिक सेवा कंपनी आहे. ग्राहकांना आपण जी वीज देतो, ती आपल्याला वीजनिर्मिती कंपन्यांकडून रोख खरेदी करावी लागते. त्यामुळे वीजबिलांचा ग्राहकांनी नियमित भरणा करावा, यावर कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. जे ग्राहक भरणा करण्यास दाद देत नाहीत, त्यांचा विद्युतपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित झालाच पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.