आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर पालक सभेत चर्चा ; बुशरा बेगम यांनी मानले आभार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बशीर कॉलनी येथील मोहसीन अहमद उर्दू प्राथमिक शाळेत शनिवारी पालक सभा घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेख नोमान अहमद होते. माजी नगरसेवक मोहसीन अहमद, माजी नगरसेविका तथा राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शाहीन बेगम यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक खान मोहम्मद यासीर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. शेख अब्दुल कुद्दुस, सय्यद मुजफ्फर, शबाना बेगम, सामिया फिरदोस यांनी सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. सकिना आफरीन यांनी पालकांचे स्वागत केले तर बुशरा बेगम यांनी आभार मानले. या वेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...