आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजरा:राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील विविध राज्यांतील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेत्यांची बैठक यात्री निवास, सेवाग्राम येथे २० नोव्हेंबर रोजी झाली. पहिल्या सत्राचे उद्घाटन कामगार नेते व भारतीय जनता कामगार महासंघाचे राज्य सरचिटणीस मिलिंद देशपांडे यांनी केले. अध्यक्ष आमदार पंकज भोयर होते. राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटकीय भाषणात मिलिंद देशपांडे यांनी वर्धा व महाराष्ट्र राज्यस्तरावर कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या कामाचा लौकिक सर्वत्र आहे. तो तसाच वाढत राहील, अशी ग्वाही दिली. आमदार पंकज भोयर यांनी विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी पूर्ण ताकदीने संघटनेसोबत उभे राहणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात बालाजी पवार यांनी विक्रेत्यांच्या प्रश्नाबाबत ऊहापोह केला. मंचावर जिल्हाध्यक्ष दीपक कुंभारे व शहर उपाध्यक्ष यशवंत ठाकरेही उपस्थित होते.

दुसऱ्या सत्राला खासदार रामदास तडस यांनी भेट दिली. केंद्र स्तरावर संघटनेच्या कामासाठी लागणारी मदत, १५ ऑक्टोबर रोजी भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा विषय केंद्रीय मंत्रिमंडळात देण्याचे आश्वासन दिले. बैठकीत राष्ट्रीय संघटन स्थापित करण्याबाबत ठराव करण्यात आले. बैठकीत केरळ, कर्नाटक, तेलंगण, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छतीसगड, महाराष्ट्र येथील संघटनांचे सर्व विभागीय उपाध्यक्ष, संघटन सचिव, प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे सभासद दिवंगत सदस्य सचिन मिटकरी यांच्या पत्नी भाग्यश्री मिटकरी यांना सांत्वना अनुदान राशी रुपये पन्नास हजारांची मुदत ठेव देण्यात आली, अशी माहिती राज्य संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...