आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेखठोक निर्णय:काम न करणाऱ्या जिल्हा संघटना बरखास्त करणार, महाराष्ट्र अ‌ॅथलेटिक्स संघटनेची भूमिका

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाच्या विकासासाठी क्रीडा संघटना महत्वाची भुमिका बजावतात. स्थानिक पातळीवर सुविधा देण्यासाठी फेडरेशन व राज्य संघटना मदत करते. मात्र, अनेक जिल्हा संघटना सुस्तावल्या आहेत. त्या काम करत नाहीत, त्यांचे पॅन कार्ड नाही, धर्मदाय कार्यालयात नोंदणी नाही, अशांना मदत करण्यास अडचणी येतात. येथून पुढे काम न करणाऱ्या जिल्हा संघटनांची मान्यता काढून घेतली जाणार असल्याची राेखठोक भुमिका महाराष्ट्र अ‌ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी जाहीर केली.

औरंगाबादमध्ये शनिवारी (दि.18) महाराष्ट्र राज्य अ‌ॅथलेटिक्स संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सुमारीवाला यांच्यासह सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत संघटनेचा 2021-22 चा कार्यक्रम जाहीर केला. सुमारीवाला म्हणाले की, देशात आम्ही उच्च दर्जाचे प्रशिक्षक तयार करण्यासाठी मेहनत घेत आहोत. स्थानिक प्रशिक्षकांकडे तंत्रशुद्ध व अनुभवाची कमी असल्याने खेळाडूंचे नुकसान होते. ते खेळांडूकडून अतिसराव करून घेतात. डोपिंग करायला लावतात, त्याचा परिणाम शरीरावर होतो. युवा खेळाडू कमी वयातच संपून जातात, असे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केल्यास एनआयएस प्रशिक्षकाही मागे पडले आहे.

खेळाडूंचा सहभाग नाही

सध्या कोणीही अ‌ॅथलेटिक्स स्पर्धा म्हणजे धावण्याच्या स्पर्धा, मॅरेथॉन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ते नियम बाह्य पद्धतीने स्पर्धा घेतात. आम्ही आमच्या खेळाडूंच्या जिवाशी खेळणार नाही. त्याची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे आता खाजगी स्पर्धेत आमचे संघटनेचे खेळाडू सहभागी होवू शकणार नाहीत. स्पर्धा आयोजकांना आमची परवानगी घ्यावी लागेल. मान्यता असलेल्या स्पर्धेत आमचे खेळाडू, पंच सहभागी होवू शकतील. अन्यथा त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही सुमारीवाला यांनी म्हटले.

ट्रॅकसाठी पाठपुरावा आवश्यक

स्थानिक पातळीवर चांगले खेळाडू घडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अ‌ॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक आवश्यक आहे. औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकुल, विद्यापीठ व साईतील अ‌ॅथलेटिक्स ट्रॅकसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. येत्या 15 ते 30 जुलैदरम्यान विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी सांगितले.

औरंगाबादला मास्टर्स, नाशिकला 18 वर्षाखालील स्पर्धा

या वेळी राज्य स्पर्धेचा कार्यक्रम केला. औरंगाबादमध्ये मास्टर्स स्पर्धा जाहीर करण्यात आली. 14 वर्षाखालील उस्मानाबाद, 16 वर्ष अमरावती, 18 वर्ष नाशिक, 20 वर्ष मुंबई उपनगर, बालगट कोल्हापूर आणि क्रॉसकंट्री परभणी येथे होईल. स्पर्धेच्या तारखा नंतर जाहीर होती.

साक्षीचा 11 हजार देवून गौरव

खेलो इंडिया युवा स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षी चव्हाणने रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिचा सुमारीवाला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साक्षीला पंकज भारसाखळे यांच्याकडून ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...