आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:दोघांच्या निलंबनामुळे राज्य तहसीलदार संघटनेत नाराजी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौण खनिज वाहतूक आणि वाहतुकीकडे कानाडोळा करत असल्याचा ठपका ठेवून कर्जतचे दोन उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलंबित केले. त्यावर कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी अाक्षेप नोंदवला. शिवाय राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेतही नाराजीचा सूर उमटला आहे. त्यांनी राज्यभरात वरिष्ठांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री विखे यांना या संदर्भात एक पत्रही पाठवले. त्यात म्हटले आहे की, रीतसर चौकशी करून निलंबन करण्यास आमचा विरोध नाही. केवळ विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निलंबित केले जाते. दिवसेंेदिवस अशा निर्णयांमध्ये वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...