आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Dispute Between Shiv Sainiks Even Before The Chief Minister's Meeting Why End Shiv Sena? Angry Shiv Sainik Anil Mule Questions Former Corporator Chetan Kamble

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच शिवसैनिकांत जुंपली:तुम्हाला पक्ष संपवायचाय का; शिवसैनिक मुळेंचा माजी नगरसेवक कांबळेंना सवाल

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच आता औरंगाबादमध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली आहे. नगरसेवक चेतन कांबळे यांनी एका वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीवरून शिवसैनिकांमध्ये वाद पेटला आहे. थेट माजी नगरसेवक चेतन कांबळे यांना कॉल करत तुम्हाला शिवसेना संपवायची आहे का, असा सवाल शिवसेनेचे पश्चिम उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी केला आहे.

काय म्हणाले अनिल मुळे?

जाणवे आणि शेंडीच्या भरोशावर औरंगाबादमधील 80 नगरसेवक निवडून येतात. तुम्हाला शिवसेना संपवायची आहे का, असा सवाल त्यांनी चेतन कांबळेंना विचारला आहे. तर दुसरीकडे अनेक समाजातील लोक जाणवे घालतात, परभणीचे खासदार बंडू जाधव हे स्वत: जाणवे घालत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितल्याचे मुळे यांनी चेतन कांबळेंना सुनावले आहे.

चेतन कांबळेंची जाहिरातीत काय?

ईडी, आर्थिक कोंडी आणि बदनामी करून उद्धव ठाकरे सरकारला घेरले, तर गाठ शिवशक्ती-भीमशक्तिशी आहे, असा इशारा चेतन कांबळे यांनी जाहिरातीतून दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना परिस्थिती प्रभावीपणे हाताळली याची दखल जागतिक पातळीवर अमेरिकन, युरोपियन संस्था, मीडियाने घेतली. उत्तर प्रदेशप्रमाणे गंगाकिनारी लाखो प्रेतं बेवारस दफन केले नाहीत. थाळ्या, टाळ्या वाजवून नाकर्तेपणा केला नाही, असा टोला चेतन कांबळे यांनी लागवला आहे. उद्धव ठाकरेंवर प्रतिगाम्यांचा राग का? अशी विचारणा करताना चेतन कांबळे यांनी आमचे हिंदुत्व बहुजनांचे आहे. दीड टक्क्यांचे नाही, शेंडी-जाणव्याचे नाही असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...