आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पदमपुऱ्यामध्ये लाइट तोडण्यावरून वाद; महिलेला बॅटने मारहाण, चौघांवर गुन्हा

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लाइट तोडण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर चौघांनी मिळून महिलेचला बॅटने मारहाण केली. ही घटना ७ मार्च रोजी पदमपुऱ्यातील सोनार गल्लीत घडली. सूर्यप्रकाश बन्सवाल (४४) व त्याचा भाचा प्रेम शिरे (२५) याच्यासह दोन महिलांनी मारहाण केली. महिलेने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, त्या सोमवारी सकाळी ११:३० वाजता घरासमोर उभ्या असताना लाइट तोडण्याच्या कारणावरून त्यांचा बन्सवाल कुटुंबासोबत वाद झाला. त्यातून बन्सवालसह दोन महिला व प्रेमने मारहाण केली. त्यानंतर कपडे काढण्याचा प्रयत्न करून बॅटने उजव्या हातावर मारले. याप्रकरणी महिलेने वेदांतनगर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्याकडे फिर्याद दाखल केल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...