आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:रेमडेसिविरवरून वाद; मेडिकल चालकाची ग्राहकास मारहाण, सिडको एन-9 भागातील घटना, अदखलपात्र गुन्हा

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार हाेत असल्याची घटना दाेनच दिवसांपूर्वी उघडकीस आलेली असताना या इंजेक्शनसाठी जास्तीचे पैसे देण्यास नकार देणाऱ्या ग्राहकाला मेडिकल चालक व इतरांनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री सिडकाे एन ९ भागातील अहिंसा चाैकात घडली. या प्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीवरून अर्बन मेडिकलचा चालक व इतरांविराेधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सिडकाेे पाेलिस ठाण्यात सुरू हाेती.

प्रवीण रामदास माेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, काेराेनामुळे आजारी असलेले माझे नातेवाईक हायटेक आधार हाॅस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागतील असे डाॅक्टरांनी सांगितले. त्यामुळे रविवारी मी अहिंसा चाैक, रायगडनगरात असलेल्या अर्बन मेडिकल चालकाकडे इंजेक्शनबाबत विचारणा केली. त्यांनी हाेकार दर्शवल्याने रात्री ९.३० च्या सुमारास या दुकानात इंजेक्शन आणण्यासाठी गेलाे. मात्र दुकानदाराने तेव्हा इंजेक्शन नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही मेडिकलच्या बाजूला विचार करत उभा राहिलाे. थाेड्याच वेळात एक अनाेळखी व्यक्ती तेथे आली व तिने जास्त पैसे देत असाल तर रेमडेसिविर मिळवून देताे असे सांगितले. मात्र आम्ही जास्त रक्कम देणार नाही, मूळ किमतीतच द्या, असे त्या व्यक्तीला सांगितले. मात्र याच कारणावरून मेडिकल चालक व त्यांच्यासाेबत असलेल्या धम्मा खेत्रे, सतीश नवगिरे यांनी माझ्याशी हुज्जत घालून मारहाण केली. दरम्यान, या वेळी रात्र गस्तीवर असलेले पाेलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी वाद मिटवला व माेटे यांना ठाण्यात नेले. तिथे माेटे यांनी मेडिकल चालकाविराेधात तक्रार दिली. दरम्यान, आता मेडिकल चालकही माेटेविराेधात परस्परविराेधी फिर्याद देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...