आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वाद:लग्नानंतर पाचच महिन्यांत वाद; 19 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर पाचच महिन्यांत कौटुंबिक वाद सुरू झाले. त्याला कंटाळून १९ वर्षीय अश्विनी कुणाल देहाडेने (रा. सैनिक विहार अपार्टमंेट, वाल्मी परिसर, मू. रा. पांढरी पिंपळगाव) आई-वडिलांना बोलावून घेतले. मंगळवारी आई-वडिलांसह भाऊ, काका-काकू घरी दाखल झाले. वादावर तडजोड सुरू असतानाच अश्विनीने मंगळवारी (७ जून) दुपारी तीन वाजता बेडरूमच्या गॅलरीतून उडी मारून जीवन संपवले.

कुणालच्या (२२) वडिलांचे वाळूजला प्रॉडक्शन युनिट आहे. तो तेथेच काम पाहतो. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक सुनील कराळे यांनी घटनास्थळी धावले. अश्विनी गर्भवती होती, अशीही माहिती कुणालने पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...