आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी शिक्षकांनीदेखील त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. विशेषत: गणित-विज्ञान विषयात विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्याचाही अट्टहास केला जातो. परंतु औरंगाबाद जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये याच विषयाच्या शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. गणित-विज्ञान विषयाच्या एकूण २३४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आहे. त्यामुळे भाषा विषयाच्या शिक्षकांना हे विषय शिकवण्याची वेळ येत आहे. विषयांचे शिक्षकच नसतील तर मग विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी राखली जाईल, असा सवालही इतर शिक्षकांनी केला आहे. १५ जूनपासून प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण गणित आणि विज्ञान विषयाची मिळून ६ हजार ३४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी गणित विषयाची ९३४, तर विज्ञान विषयाची ९५२ आहेत. अनुक्रमे ११८ आणि ११६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ४६८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ८३ मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने शाळेवरील शिक्षकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे, त्यात दोन ते तीन वर्गांचा अधिकचा भार एकाच शिक्षकावर असल्याने रिक्त पदे भरली जाणार तरी कधी, असा प्रश्न शिक्षक संघटनांतून उपस्थित केला जात आहे. प्राथमिक शाळांमध्ये सहशिक्षकांची उर्दू आणि मराठी माध्यमासाठीची ४६८ पदेही रिक्त आहेत. जिल्ह्यात जि. प. च्या २१३२ शाळा आहेत. त्यातील प्राथमिक शाळांसाठी विविध ९५०१ पदे असून त्यातील ६६३ पदे रिक्त, तर ८८३८ शिक्षक कार्यरत आहेत. केंद्रप्रमुखाची १२८ पैकी ९२, तर विस्तार अधिकाऱ्यांची ४५ पैकी २० पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील अध्ययन स्तर घसरलेला असताना तो उंचावणे शिक्षकांसाठी आव्हान आहे.
८३ शाळांवर मुख्याध्यापकच नाहीत प्राथमिक शाळांसाठी ५६४ मुख्याध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४८१ पदे भरलेली असून ८३ शाळांवर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. शाळांमध्ये काही पदांच्या जागा रिक्त आहेत. त्या लवकरच भरल्या जातील. अतिरिक्त शिक्षक समायोजन आणि बदली प्रक्रियेतूनही काही पदे भरली जातील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ^शिक्षकांची पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. भाषा विषयाच्या शिक्षकांना मर्यादा आहेत. ते गणित-विज्ञान विषयाची तयारी कशी करून घेतील. आधीच पदे रिक्त त्यात अशैक्षणिक कामात शिक्षक गुंतला तर शाळेचे आणि तासिकांचे योग्य नियोजन करण्यात मुख्याध्यापकांना अडचणी येतात. त्या नियोजनासाठी मुख्याध्यापकांचीही गरज असते. त्यांचीदेखील पदे रिक्त असल्यास शाळेला अडचण येते. - डॉ. रुपेश मोरे, शिक्षक, मराठा हायस्कूल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.