आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेेऊन कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३७ जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिली.जिल्हा परिषदेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. मागील अनेक वेळा जाहीर होऊनसुद्धा भरती प्रक्रिया झाली नाही. मात्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रित), गट क, गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आता मे-जून महिन्यात भरती प्रक्रियेचे आदेश दिले आहेत.
यामुळे जिल्हा परिषद प्रशासन स्वतंत्र कक्षाची स्थापना करून भरतीची तयारी करत आहे. या प्रक्रियेत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष-६२, महिला-२२६), प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१, औषध निर्माण अधिकारी ८, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहायक ३, कनिष्ठ सहायक २८, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १, वित्त विभागातील वरिष्ठ सहायक १, कनिष्ठ सहायक ४, कृषी विभागातील विस्तार अधिकारी १, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका ९, पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक १३, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १९, पंचायत विभागातील ग्रामसेवक १६ अशी एकूण ४३७ पदे भरण्यात येतील. या भरतीसाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल.
असे आहे भरतीचे वेळापत्रक
१५ ते २२ मेदरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर अर्ज मागवणे, छाननी, पात्र उमेदवारांचे हॉलतिकीट तयार करणे ही सर्व प्रक्रिया जून-जुलैत होईल, तर ऑगस्टमध्ये ऑनलाइन परीक्षा होईल, त्यानंतर निकाल जाहीर करून सप्टेंबरपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.