आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्णाचे वाढ:जि. प. च्या आरोग्य विभागात कोरोना लसीचा तुटवडा; जुने डोस एक्सपायर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभराप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून लसीकरणावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिक त्याबाबत अनुत्सुक असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेकडील कोरोनाचे हजारो डोस एक्स्पायर झाले असून नवीन डोस अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे लस उपलब्धच नसल्याचे चित्र आहे.

सध्या जिल्हा परिषदेकडे कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि काॅर्बेव्हॅक्स यापैकी कोणतीच लस उपलब्ध नाही. आरोग्य विभागाकडे पडून असलेल्या हजारो डोसची मुदत ३१ मार्च २०२३ लाच संपली आहे. तेव्हापासून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परतावे लागत आहे. आरोग्य विभागाने नवीन लसीची मागणीच अजून केलेली नाही.

लसीसाठी पाठपुरावा सुरू जिल्हा परिषदेकडे असलेल्या लसीची मुदत संपली आहे. गेल्या पाच दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प आहे. लस मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे. - डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी