आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण:हरिनाम सप्ताहात 1 हजार ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप ; भास्कर महाराज रसाळ यांची संगीत श्रीरामकथा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चातुर्मास समाप्तीनिमित्ताने चिकलठाणा येथील सावता महाराज मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत रामकथेचे आयोजन करण्यात आले. यंदाचे २५ वे वर्ष असल्याने १ हजार ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप संस्थापक अध्यक्ष मदनराव देवराम कारभारी नवपुते यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले. सोहळ्यानिमित्त १२१ महिला पारायणासाठी बसल्या आहेत.

संत सावता मंडळाच्या सभागृहात हा सोहळा आयोजित सुरू असून ८ नोव्हेंबर येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहाची सुरुवात एकतुनीचे मठाधिपती सूरजगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. याप्रसंगी किसन जाधव, तुकादास काटे गुरुजी, निवृत्ती घोडके, अनिता पवार, माजी महापौर बापू घडामोडे, माजी सभापती दिलीप थोरात यांची उपस्थिती होती. ज्ञानेश्वरी पारायणाने अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली. सप्ताहात दररोज काकडा भजन, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ, संतपूजन, महाआरती तसेच संगीत श्रीराम कथा होत आहे.

दायित्वही निभावणार
८ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर होणार असून त्यानंतर श्रीराम कथा ग्रंथ मिरवणूक, शोभायात्रा काढण्यात येईल. नाशिक येथील रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सांगता होईल.

बातम्या आणखी आहेत...