आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव:बारावी प्रश्नसंच पुस्तिकेचे पाचच तालुक्यांत वाटप ; साप्ताहिक परीक्षा आजपासून होणार सुरू

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात यावे, त्यांची बोर्ड परीक्षांचीही तयारी व्हावी, लेखनाचा सराव व्हावा या हेतूने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची पहिली साप्ताहिक परीक्षा आता २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, केवळ पाचच तालुक्यांत प्रश्नसंच पुस्तिकेचे वाटप झाल्याने याच तालुक्यांत परीक्षा होईल. उर्वरित तालुक्यांत १ डिसेंबरनंतर परीक्षा घेतली जाईल,अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च होतात. दरवर्षी पावणेदोन लाख विद्यार्थी विभागातून परीक्षेला बसतात. परंतु बरेच विद्यार्थी महाविद्यालयात नियमित न येता थेट परीक्षेला येतात. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात यावे यासाठी साप्ताहिक परीक्षा घेण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने औरंगाबाद जिल्ह्यापुरता घेतला आहे. त्यानुसार साप्ताहिक परीक्षा देणे आणि त्या परीक्षेला हजर राहणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी या परीक्षेसाठीची तयारी सुरू केली आहे. पहिली साप्ताहिक परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, ऐनवेळी छपाईच्या तांत्रिक कारणामुळे प्रश्नसंच पुस्तिका उपलब्ध न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

नियोजन तर केले, पण त्यातही आला अडथळा २४ नोव्हेंबरपासून परीक्षेचे नियोजनही करण्यात आले. मात्र त्यातही अडथळा आला अाहे. जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, खुलताबाद, वैजापूर या पाच तालुक्यांतच प्रश्नसंच पोहोचले असून, तेथेच २४, २८ व ३० नोव्हेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. गंगापूर, पैठण, कन्नड तसेच औरंगाबाद शहर व ग्रामीण येथील महाविद्यालयांत ही परीक्षा १ डिसेंबरनंतर घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...