आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड थंडी:रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे गरजूंना 160 ब्लँकेट वाटप

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यापासूनच थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. यासाठी रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे ग्रामीण भागातील गरजू-निराधार लोकांना १६० ब्लँकेट वाटप करण्यात आले. बीड बायपास येथील रामकृष्ण मिशन आश्रमच्या वतीने सांजखेडा येथे ३४, डायगव्हाण-२६, चिंचोली- २६, आपतगाव क्रमांक २- २४, माळीवाडा पारधी वस्ती- ५० येथे स्वामी चेतनात्मानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले. यासाठी आश्रमाचे स्वयंसेवक संजय गुंडेवार, किरण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. सध्या थंडी प्रचंड वाढत आहे. रस्त्यांवर राहणाऱ्या गरजवंतांसाठी येत्या काळात एकूण ५०० ब्लँकेट वाटप केले जाणार असल्याचे आश्रमाकडून कळवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...