आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनाधीनता हानिकारक:थर्टी फर्स्टनिमित्त जटवाड्यात 200 लिटर दुधाचे वाटप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थर्टी फर्स्टनिमित्त युवा, तरुण मुले दारूच्या व्यसनाकडे वळत आहेत. दारू पिणे, ढोल-ताशाच्या निनादात नाचणे व नवीन वर्षाचे स्वागत करणे फॅशन बनले आहे. त्यामुळे स्वत:च्या भविष्य, आरोग्यासाठी आणि कुटुंब व समाजासाठी व्यसनाधीनता हानिकारक आहे. याविषयी जनजागृृती करण्यासाठी दारूऐवजी दूध प्या, असे अभियान सहारा व्यसनमुक्ती केंद्र व जिल्हा दूध संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राबवून दोनशे लिटर दूध वाटप करण्यात आले. सहारा व्यसनमुक्ती केंद्र व दूध संघाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी देवळाई चौक, जटवाडा रोड, एकतानगर येथे सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत २०० लिटर दूध मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे यांच्या हस्ते झाले. दिलीप निरफळ, रवींद्र कोळगे, सुरेश सुरडकर, डॉ. अस्मिता निंबाळकर, डॉ. संकपाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. केंद्राचे संचालक सुनील बढे यांनी व्यसनमुक्तीविषयक मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...