आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात शालेय विद्यार्थी, मनपा कर्मचारी व अधिकारी यांच्या सहभागाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी पालिका शाळांतील १२२ गुणवंत विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागातर्फे १४ लाख २० हजार रुपयांची रोख पारितोषिके वाटप करण्यात आली.
९५ टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या एका विद्यार्थ्यास २५ हजार रुपये, ९० टक्के ते ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये, ८५ टक्के ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्या २९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, ८० टक्के ते ८५ टक्के गुण मिळवणाऱ्या ८८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये अशा एकूण १२२ गुणवंत विद्यार्थ्यांना १४ लाख २० हजार रुपयांची रोख पारितोषिके वाटप करण्यात आली.
पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या दहावी व बारावीतील गुणवंत पाल्यांचाही सत्कार सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आला. पालिकेच्या इंदिरानगर बायजीपुरा या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे त्या शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र साळुंके व सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी वर्धापन दिन साजरा पालिकेच्या दहा शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमात समूह नृत्य, लोकनृत्य, स्वच्छताविषयक नाटिका, देशभक्तिपर गीते, लावणी सादर केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाद्यवृंदाच्या साथीने गीत सादर केले. सूत्रसंचालन अश्विनी हिवरडे व नंदा गटकाळ यांनी केले. शीतल रुद्रवार व प्रेषित रुद्रवार प्रस्तुत ऑर्केस्ट्राने विविध गीते सादर केली. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, भारत तीनगोटे, ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापिका संगीता ताजवे, ऊर्मिला लोहार, शशिकांत उबाळे, विजय कोल्हे, जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात, अतुल बनकर, हंसराज बनस्वाल, शहबाज खान, संजय मरकड यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.