आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून मोफत बियाणे वाटप, शेतकऱ्यांना दिलासा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या मदतीने आणि ग्रीनग्लोब फाऊंडेशन यांच्या माध्यमातून कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे परिसरातील अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.

गेल्या दोन वर्षापासून सी. एस. आर. निधीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान पन्नास हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले आहे. या वेळीही किमान दीड हजार शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कन्नड तालुका देवगाव रंगारी येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या वतीने व ग्रीनग्लोब फाउंडेशन यांच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी- बियाणे वाटप करण्यात आले. व भव्य शेतकरी मेळावा घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार जी उपस्थित होते.

नागरिक उपस्थित

संयुक्त संचालक जाधव , कृषी अधिक्षक तुकाराम माटै, विभागीय कृषी अधिकारी सिल्लोड पी. व्ही. चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन कराड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा सचिव संजय गव्हाणे, उपविभागीय अधिकारी गंगापूर तौर आदी कन्नड तालुका देवगाव रंगारी येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खरीप हंगामाची लगबग

सध्या खरीप हंगामाची सर्वत्र लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि ग्रीनग्लोब फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत बियाणे वाटप हे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. कापूस मका ज्वारी बाजरीचे बियाणे या किटमध्ये असून त्याची किंमत 5 हजार 700 रुपये इतकी आहे.

बातम्या आणखी आहेत...