आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधी कॉलनी गुरुद्वारा येथे आयोजन:गुरुद्वारांमध्ये तीन दिवस कथा, कीर्तनासह लंगर प्रसाद वाटप

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीख धर्माचे नववे गुरू तेगबहादूर यांच्या शहीद दिनानिमित्त सिंधी कॉलनी येथील गुरू तेगबहादूर लंगरसाहिब गुरुद्वारा तसेच धावणी मोहल्ला येथील भाई दयासिंग भाई धरमसिंग गुरुद्वारामध्ये तयारी सुरू आहे. २६ ते २८ तारखेपर्यंत कथांसह कीर्तन होणार आहे. तसेच लंगरचा प्रसाद देण्यात येईल.

सिंधी कॉलनी येथील गुरुद्वाराचे प्रमुख रणजितसिंग गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री अखंड पाठसाहिब याची सुरुवात होणार आहे. २८ तारखेला सकाळी ८.३० वाजता समाप्ती होईल. या वेळी ३००० भाविकांसाठी लंगरची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमांसाठी गुरजितसिंग छाबडा, जसपालसिंग मखिजा, हरदेवसिंग मुच्छल, अवतारसिंग सौढी, सुरेंद्रजितसिंग सबरवाल, हरपालसिंग गंभीर, कुणाल गुरुदत्ते, सरजितसिंग सहकार्य करीत आहेत.

तीन दिवस कीर्तन, कथा : सिंधी कॉलनीसह धावणी मोहल्लामध्ये कीर्तन, कथांचे आयोजन होईल. यासाठी चंदीगड येथील भाई बलविंदरसिंग यांना आमंत्रित करण्यात आले आहे. २६ तारखेला पहिले कीर्तन धावणी मोहल्ला येथील गुरुद्वारामध्ये सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत होईल. कीर्तनानंतर लंगरचे आयोजन केले आहे. २७ तारखेला सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत आणि २८ तारखेला सकाळी ११.४५ मिनिटांनी ते १.३० वाजेपर्यंत सिंधी कॉलनी येथील गुरुद्वारामध्ये कीर्तन होईल.

२८ तारखेला इंद्रजित कौर यांचे कीर्तन २८ तारखेला सकाळी १० वाजता इंद्रजित कौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री सत्संग होणार आहे. यानंतर सकाळी १०.३० वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेचे रागी जत्था भाई गुरुमितसिंग दिल्लीवाले यांचे कीर्तन होईल. सकाळी १०.५० मिनिटांनी धावणी मोहल्ला गुरुद्वारा येथे पटियावाले परनामसिंह चौहान कथा वाचन करणार आहेत. सकाळी ११.१५ मिनिटांनी अमरजितसिंह आनंदपूर साहिबवाले कीर्तन सादर करणार आहेत. रणजितसिंग गुलाटी, अध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...