आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्काराचे आज वितरण ; नागरिकांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण सोहळा १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात होईल. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा आणि प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यंदाचे मानकरी आहेत. साहित्यिक सुधीर रसाळ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. या वेळी महात्मा गांधी मिशनचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...