आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोर्डाद्वारे दहावीची लेखी परीक्षा मार्चमध्ये घेतली जाणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य वितरण विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा वितरण केंद्रावर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली. दहावीच्या लेखी परीक्षेस २ मार्चपासून सुरुवात होत आहे. प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी १ लाख ८० हजार २१० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र (हॉलतिकीट) कॉलेज लॉग इनमध्ये सकाळी ११ वाजेपासून मंडळातर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.