आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक मदत:‘लायन्स क्लब ऑफ अँजल’तर्फे 15 मुलांना शालेय साहित्य वाटप

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब परिस्थितीमुळे झोपडपट्टीत राहत असले तरी शिक्षण प्रत्येक मुलाचा हक्क आहे. मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ एंजलच्या वतीने बीड बायपास येथील १५ गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. यानंतर खाऊही देण्यात आला.

बेरील संचिस यांच्या हॅप्पी मोमेंट्स संस्थेने शिक्षणाची सोय केली जाते. या मुलांना कधी कधी उपासमार, तर घर चालवण्यासाठी त्यांना भीक मागावी लागते. शिक्षणच त्यांचे भविष्य घडवू शकते. लोकांनी शैक्षणासाठी मदत करावी, असे आवाहन बेरील यांनी केले. लायन्स क्लब ऑफ अँजल ग्रुपच्या सदस्या गीतू छाबडा, दीपाली घुगे, मोना ठोकल, रुमित गुरुदत्त, शिल्पा अग्रवाल आणि शिल्पा आग्रहारकर यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...