आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञता व्यक्त:वीर माता-पिता, वीरपत्नी, सफाई कामगारांना मिठाईचे वाटप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गजानन सर्व्हिसेसतर्फे जिल्ह्यातील वीर माता-पिता, वीरपत्नी तसेच सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. सैनिकांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजगौरव पुरस्कार प्राप्त तथा पूर्व भारतीय सैनिक गजानन पिंपळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी वीर माता-पिता व वीरपत्नी यांची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेत त्यांना मिठाईची भेट दिली. तसेच हडको येथील सफाई कामगारांच्या ग्रुपला मिठाई वाटप केली. कंपनीसाठी सतत झटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस व गिफ्ट भेट म्हणून दिले. या वेळी गजानन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल तिळवे व इतर अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...