आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरवारे कम्युनिटी सेंटर व छत्रपती संभाजीनगर बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गत आठवड्यात 17 वर्षाखालील जिल्हा बुद्धिबळ संघ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून मुलांच्या गटात कौस्तुभ वाघने विजेतेपद व सुदीप पाटीलने उपविजेतेपद आणि मुलींच्या गटात भुमिका वाघलेने विजेतेपद व पलक सोनीने उपविजेतेपद पटकावले.
या कामगिरीमुळे अव्वल चार खेळाडूंची बुलढाणा येथे 14 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय फिडे रेटिंग अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या संघात निवड झाली आहे. जिल्हा संघ स्पर्धेसाठी आज (ता. 12) रवाना होणार आहे. कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून दिव्यांग खेळाडू रोहन झांबरेचा विशेष गौरव करण्यात आला. विजेत्या खेळाडूंना कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनिल सुतवणे व महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनाचे सहसचिव हेमेंद्र पटेल यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. सर्व सहभाग खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी रमाकांत रौत्तले, स्पर्धा सचिव मिथुन वाघमारे, मुख्य पंच विलास राजपूत यांची उपस्थिती होती.
निकाल पुढीलप्रमाणे
17 वर्षाखालील गट - कौस्तुभ वाघ (प्रथम), सुदीप पाटील (द्वितीय), संकल्प सोनवणे (तृतीय), आर्यन बहुरे (चतुर्थ), ऋग्वेद पोद्दार (पाचवा). मुली - भुमिका वाघले (प्रथम), पलक सोनी (द्वितीय), धनश्री गावंडे (तृतीय), भक्ती गवळी (चतुर्थ), राधिका तिवारी (पाचवा). उत्कृष्ट बाल खेळाडू - विश्वास वाडकर, वेद झांबरे, देवांश तोतला, यश गायके, स्वरा लढ्ढा, भक्ती गवळी आणि देवांश्री गावंडे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.