आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत युवराज चरावंडे, सुव्रत सुरंगळीकर, तेजस ताम्हणेने जिंकले सुवर्णपदक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनियस चेस अकादमीच्या वतीने सिल्लोड येथे आयोजित खुली बुद्धिबळ स्पर्धेत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध गटात युवराज चरावंडे, सुव्रत सुरंगळीकर, तेजस ताम्हणेने यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ग्रामीण भागातील नावोदीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने सोमवारी आयोजित या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरसह जालना, बुलढाणा, बीड, हिंगोली, जळगाव येथील एकूण 120 खेळाडूंनी 9, 14 वर्षाखालील व खुल्या गटात सहभाग नोंदवला होता. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व पदक प्रदान करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्यांना माधवराव कोलते, माजी सैनिक प्रेमसिंग राजपूत, दिपक समिंद्रे, गौतम जैन आणि आयोजक मयुरेश समिंद्रे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सार्थक, पहल सर्वोत्कृष्ट खेळाडू

स्पर्धेत सार्थक देखमुखला सर्वोत्तम बाल खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. तसेच पहल बंब सर्वोत्तम महिला खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. त्याचबरोबर, सिल्लोड येथील केंब्रिज इंग्लिश स्कूलला सर्वोत्तम शाळा म्हणून ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे

9 वर्षे गट - युवराज चरावंडे (सुवर्ण), नमन जैन (रौप्य), अन्वेश देशमुख (कांस्य), हिंदवी मोरे (चतुर्थ), स्वराज निकम (पाचवा). 14 वर्ष गट - सुव्रत सुरंगळीकर (प्रथम), सोहम चांडक (द्वितीय), गौरव चुंगडे (तृतीय), ओम चरावंडे (चतुर्थ), आयुष दौड (पाचवा). खुला गट - तेजस ताम्हणे (प्रथम), शिवम ताम्हणे (द्वितीय), दिनेश क्षीरसागर (तृतीय), गोपाल चरावंडे (चतुर्थ), आजिनाथ राठोड (पाचवा).