आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • District Co operative Milk Producers Association Annual Meeting Should Not Try To Suppress Voice By Threats, Members Aggressive Against President Haribhau Bagde

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा:धमक्या देत आवाज दाबण्याचा प्रयत्न नको, अध्यक्ष बागडेंविरोधात सदस्य आक्रमक

संतोष देशमुख । औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 62 वी वार्षिक सभेत शनिवारी अवाजवी खर्च, नफातोटा, परस्पर कर्ज वाटप, दुध दरवाढ आदी मुद्यावरून सभासद आक्रमक झाले होते. प्रश्नावर प्रश्न उपस्थित करून त्यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना चांगलेच कोंडीत पकडले होते.

त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे विरोध करतील त्यांची नावे लिहून घेतली जातील, असे म्हणाले. यामुळे गदारोळ आणखी वाढला व धमक्या देवून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका व गैरकारभाराचे ठरावही मंजुर करता येणार नाही, अशा कडक शब्दांत सभासदांनी प्रतिउत्तर दिले. यामुळे विधानसभा गाजवणारे बागडे दुध संघाच्या सभेत मात्र, पहिल्यांदा गलितगात्र झाल्याचे दिसून आले.

2021,22 आर्थिक वर्षाची अधिमंडळाची सभा शनिवारी पाटीदार भवनाच्या सभागृहात घेण्यात आली. सभेची सुरुवात दीप प्रज्वलन व वंदे मातरम गीताने झाली. शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपाध्यक्ष दिलीप निरपळ यांनी प्रास्ताविकात दुध संघाच्या वार्षिक वाटचाली विषयी माहिती दिली. त्यानंतर इतिवृत्त वाचून कायम करणे पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आर्थिक वर्षाच्या संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, ताळेबंद पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक स्वीकारणे व वाचून कायम करण्यासाठी उपस्थित झाला.

दूध संकलनात घट का - सदस्य

बागडे यांनी हातवर करून मंजूर का? असे विचारले असता नामंजूर असा एकच सुर उमटला. तर नंदू जाधव, शिवाजी बनकर यांनी दूध संकलनात घट का होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच दररोज कोणती भांडण सुरु आहेत ज्यामुळे कायदेशीर सल्लागार व वकील शुल्क 5 लाखांचा खर्च 12 लाखांवर जावून पोहोचला. तुम्ही अध्यक्ष असताना या खर्चात कपात होण्याऐवजी दुप्पटपेक्षा वाढ झाली आहे. ठेकेदार खर्च, बॉयलर जळतन खरेदी खर्च 13 लाखांवरून 24 लाखांवर जावून पोहोचला असून अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना जळतनावरील दुप्पट वाढलेला खर्च संशय घेण्यास वाव देत असल्याचे नमुद करून बागडे यांना चांगलेच कोंडीत पकडले होते. टेंडर न काढणे, परस्पर कर्ज वितरण, जागाभाडे कमी घेणे, अवाजवी खरेदीवरील खर्च, केंद्राला भेट न देणे आदींचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

खासगी संस्था 36 रुपयांनी खरेदी

त्यामुळे सभासदांनी शासकीय लेखापरीक्षण व्हावे. खासगी संस्था 36 रुपये लिटरने दुध खरेदी करत आहे. त्यामुळे संघानेही दोन रुपये दरवाढ करावी. संकलन केंद्राला एक रुपया वाढवून मिळावा अशा मागण्या केल्या. पहिल्यांदाच बागडेंना विरोध झाल्याचे बघायला मिळाले. यामुळे त्यांचा जीवही कोरडा पडून पाणीपाणी करत होता. तसं तसे ते पाणीही पिवून उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते.

एक रुपयांनी दरवाढ

एक रुपयांनी दरवाढ देत सभा गुंडाळलीखासगी दुध संस्थेशी स्पर्धा करणे परवडणार नाही. दोन रुपये दरवाढ देणे शक्य नसल्याचे सांगत बोनस न देण्याच्या अटीवर उत्पादकांना एक रुपया दरवाढ देण्याचे जाहीर करून बागडे यांनी पुन्हा गोंधळ होण्यापूर्वीच राष्ट्रगीताला सुरुवात करत सभा गुंडाळली. एक रुपया दरवाढ म्हणजे पूर्वी 34 रुपये खरेदी दर होता तो आता 35 रुपये झाला आहे. यांची होती उपस्थितीसंचालक नंदलाल काळे, कचरू डिकेपाटील, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, पुंडलिकराव काजे, श्रीरंग साळवे, संदीप बोरसे, सवीता अधाने, सुमित्राबाई चोपडे,शिलाबाई कोळगे, अलका पाटील, इंदूबाई सुरडकर, राजेंद्र पाथ्रीकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदिप पाटील यांच्यासह सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...