आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनतेमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवीन 'शक्कल' लढवली आहे. त्यासाठी यांच्या आवाहनाचे संदेश चित्रपट गृह, नाट्यगृह मधून प्रसारित करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने लसीकरण सक्तीचे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रमाणात मागे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आता लसीकरणाची जनजागृती चित्रपट गृहात करण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालयांना नियमांची सक्ती
लसीकरण हे सुरक्षा कवच आहे. लसीकरण वाढविण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या तिन्ही डोसबाबत रुग्णांना विचारणा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी ज्याप्रमाणे HIV सह काही तपासण्या बंधनकारक आहेत, त्याप्रमाणे RT-PCR चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला.
केस पेपरवर नोंद
लसीकरण झालेले आहे का नाही याबाबत केस पेपरवर नोंद घेतली जाणार आहे. या केसपेपरची तपासणी यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासनाचे शहरी भागातील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एकूण दहा आरोग्य केंद प्रमुखांना लसीकरण कमी झाल्याच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.