आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वसमतच्या कोवीड सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोबाईलवरून वॉच, स्वच्छते सोबतच रुग्णांच्या आरोग्य सेवेचीही पाहणी

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील वसमत येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा व आरोग्य सेवेवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा मोबाईलवरून वॉच सुरु असून कर्तव्यात कसून केल्यानंतर तातडीने भ्रमणध्वनीवरूनच सुचना दिल्या जात असल्याने कोवीडरुग्णांना दिलासा मिळू लागला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मागील काही दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आैद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुमारे ५० बेडचे कोवीड केअर सेंटर तयार करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नवोदय विद्यालयात सुुरु असलेल्या विलगीकरण कक्षाचे कोरोना कोवीड सेंटरमध्ये रुपांतर करण्याच्या सुचना दिल्या. या शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नवोदय विद्यालयाच्या कोवीड केअर सेंटरवर भेट दिली. त्याठिकाणी स्वच्छता व रुग्णांना आरोग्य सुविधा देण्याच्या सुचनाही दिल्या.

दरम्यान, हिंगोली शहरापासून सुमारे ६० किलो मिटर अंतरावर वसमत शहर असल्याने त्या ठिकाणी तातडीने पोहोचणे शक्य नाही. सदर बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून सदर कॅमेरे इंटरनेटद्वारे मोबाईलला कनेक्ट केले आहेत. त्यामुळे वसमतच्या या दोन्ही कोवीड सेंटर मध्ये स्वच्छता होत आहे काय, त्या ठिकाणी रुग्णांना वेळेत चहापाणी, भोजन दिले जात आहे काय तसेच आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी येत आहे काय याची पाहणी करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीच्या सुचना देणेही शक्य झाले असून जिल्हाधिकारी जयवंशी यांना वापरलेल्या या फंड्यामुळे दोन्ही ठिकाणी असेलल्या कोवीड रुग्णांना दिलासा मिळू लागला आहे.

दिवसांतून चार वेळा तपासणी

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडून दिवसभरातून चार वेळा तपासणी केली जात आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्रीच्या वेळी होणाऱ्या तपासणी नंतर तेथे पुरेशा सुविधा मिळत आहेत याची खात्री केली जात आहे. या शिवाय रुग्णांची तक्रार आल्यानंतर त्याची शहानिशा करून त्याची तातडीने सोडवणुक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...