आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालय कायाकल्प प्रकल्प:जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम, 50 लाखांचा पुरस्कार जाहीर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णालय कायाकल्प प्रकल्पांतर्गत चिकलठाण्यातील मिनी घाटी म्हणजेच जिल्हा रुग्णालयाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. रुग्णालयास ९८.२९ टक्के गुण मिळाले असून ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दुसरा क्रमांक वर्धा जिल्हा रुग्णालयाला मिळाला आहे.

२०२१-२२ च्या पुरस्काराची सोमवारी घोषणा करण्यात आली. रुग्णांना दिलेल्या चांगल्या सुविधांमुळे आैरंगाबादला राज्यात पहिल्या क्रमांकाचे पारितेषिक मिळाल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘कायाकल्प’ अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी मागील १९ मे रोजी आरोग्य विभागाच्या पथकाकडून करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून कायाकल्प अभियान राबवण्यात येत आहे. यात सर्वांगीण विकास साधणाऱ्या हॉस्पिटलला अनुदान दिले जाते. नाशिक येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद गुंजाळ यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली हाेती.

सुविधांच्या आधारे झाली निवड डाॅ. मोतीपवळे म्हणाले, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, कर्मचारी, डॉक्टर तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांचे ज्ञान आदी निकषांच्या आधारे निवड केली जाते. त्यानुसार औरंगाबाद जिल्हा रुग्णालयाला ९८.२९ इतका स्कोअर मिळाला. डॉक्टर, कर्मचारी, नर्स यांच्या कामाचे हे यश आहे.

बातम्या आणखी आहेत...