आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 ऑगस्ट राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करणार:जिल्हा भालाफेक स्पर्धा; शाहरुख, चंचल, आदित्य, वैशाली ठरले चँम्पियन

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा अँथलेटिक्स संघटना व सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.सभु महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या भालाफेक या स्पर्धेत शाहरुख शेख, चंचल देवकर, आदित्य नरवडे आणि वैशाली लिंगायत यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.

गत वर्षी टोकियो आँलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट रोजी भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक या अँथलेटिक्सच्या क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून देत इतिहासीक कामगिरी केली होती. हे भारताचे अँथलेटिक्समधील पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक ठरले. नीरजची ही कामगिरी सर्व उद्योन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत राहावे, याकरिता भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या वतीने देशभर 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, उपप्राचार्य डॉ.माधव गायकवाड, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे हे उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन प्रा. अमृत बिऱ्हाडे यांनी केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॲथलेटिक्सचे तांत्रिक समितीचे प्रमुख डॉ. दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या पुनम नवगिरे, प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, डॉ. सचिन देशमुख, डॉ. राम जाधव, डॉ. सुहास यादव, प्रा. मधुकर वाकळे, प्रा. भरत रेड्डी, प्रा. राहुल अहिरे आणि तुषार खेडकर यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

पुरुष खुला गट - शाहरुख शेख (प्रथम), रवींद्र थोरे (द्वितीय), तुषार शिंदे (तृतीय). महिला खुला गट - चंचल देवकर (प्रथम), दिव्या इंगळे (द्वितीय), दिशा जोशी (तृतीय). 20 वर्षा आतील मुले - आदित्य नरवडे (प्रथम), अभिषेक गदादे (द्वितीय), संदेश फोलाने (तृतीय). 20 वर्षा आतील मुली - वैशाली लिंगायत (प्रथम), योगिता कदम (द्वितीय), खुशी फत्तेलष्कर (तृतीय).

बातम्या आणखी आहेत...