आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावंदे यांना नोटीस बजावली:जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे ‘आदर्श’ नियुक्तीवरून अडचणीत

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांना सेवानिवृत्त क्रीडाधिकाऱ्याला विनामोबदला सेवेत सामावून घेतल्याप्रकरणी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नोटीस बजावली आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडा विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याच्या अनुषंगाने नावंदे यांनी सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांना २९ एप्रिल रोजी विनामूल्य सेवेत दाखल करून घेतले होते. तत्पूर्वी दिंडे यांनी विनामूल्य सेवा देण्याचा अर्ज नावंदेंना दिला होता. त्या अर्जाला मान्यता देऊन नावंदे यांनी दिंडे यांची परस्पर नेमणूकही करून टाकली.

ही नेमणूक करताना नावंदे यांनी हे राज्यातील आदर्श उदाहरण असल्याचे म्हटले होते. शिवाय काही कर्मचारी कामचुकारपणा करतात, असे सांगत दिंडे यांना रुजू करून घेतले होते. जिल्हा क्रीडाधिकारी नावंदेंकडून निवृत्त कर्मचाऱ्याकडून तात्पुरत्या स्वरूपात सेवा घेण्याची बाब क्रीडा व युवक सेवा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या कानी पडल्यानंतर त्यांनी २ मे रोजी कविता नावंदे यांना नोटीस बजावली. राजाराम दिंडे यांची सेवा घेण्याचे आदेश प्रचलित नियमास अनुसरून नाहीत. त्यामुळे सदर आदेश रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ करावी व कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे या नोटिशीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...