आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा तेंग सू डो स्पर्धा:अर्जुन, सर्वेश, नंदिनी, निकिताला सुवर्णपदक, राज्य स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ औरंगाबादच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय तेंग सू डो स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेत विविध गटात अर्जुन घाडगे, सर्वेश जाधव, कौस्तुभ बान्टे, नंदिनी भोगले, प्रियांका शास्त्री, तनिष्का फुसे यांच्यासह एकूण 25 खेळाडूंनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महर्षी विद्यालय, एन 4 सिडको येथे पार पडलेल्या स्पर्धेत एकूण 230 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

ही स्पर्धा बालगट, कॅडेट, कनिष्ठ व वरिष्ठ गटात मुलेमुली खेळाडू पुमसे व स्पायरिंग प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ शिर्डी येथे 17 ते 18 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय तेंग सु डो (कोरियान कराटे) स्पर्धेत औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करेल. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरुण भोसले, सचिव कैलास जाधव, गणेश वास्कर, अक्षय सोनवणे, सचिन काळे, कुणाल पाटील, शिवम दसरे आदींची उपस्थिती होती.

विजयी खेळाडू पुढील प्रमाणे

सुवर्णपदक - अर्जुन घाडगे, सर्वेश जाधव, कौस्तुभ बान्टे, श्रेयश पवार, आदित्य नरवडे, अनय नवपुते, रोहन मुंढे, ओम बुबणे, सार्थक कसबेकर, ऋग्वेद कुलकर्णी, ओम महेर, आदित्य मुंढे, कार्तिक डक, विराम देवरा, भाऊसाहेब घुगे, अमन सिंग, ओंकार पाटील, अविनाश राठोड, ध्वनी भुसारी, पोशिंका भेंडाळे, नंदिनी भोगले, प्रियांका शास्त्री, तनिष्का फुसे, अश्विनी रुचक, निकिता बढे.

रौप्यपदक आयांश कोम्मरू, सोहम कसबेकर, अथर्व तागडे, अर्णव कावळे, अर्णव गरड, कृष्ण पाल, प्रद्युम्न मिटकर, आर्यन कायंदे, हर्षल गायके, रुद्र जाधव, आदर्श नेहाले, यश दिवेकर, रेवा देशपांडे, काव्या भुसारी, श्रुती शिंदे, गौरी रामपूरकर, सेन्हा शास्त्री, श्रद्धा कटारे.

कांस्यपदक प्रथमेश खुरमुटे, साहिल शेख, आरव सरोदे, आर्यन कावळे, सोहम गंभीरराव, प्रभुजी मिटकर, आदित्य डोईफोडे, पवन हिवाळे, क्रिशांक साखरे, सार्थक बगलाने, महेश अपूर्वा, आरुष मोठे, श्लोक रामदासी, कौस्तुभ लखपती, प्रत्युषा रक्ताडे, स्वरा थोरात.

बातम्या आणखी आहेत...