आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृहातील मुलांचे तपशील कुणाला देऊ नका:जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांचे सर्व संस्थांना आदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल न्याय अधिनियमानुसार बालगृह, निरीक्षणगृहातील मुलांचे फोटो आणि तपशील प्रसिद्ध करण्यास बंदी आहे. त्यामुळे बालगृह, निरीक्षणगृह आणि शिशुगृहाने याबाबत काळजी घ्यावी अन्यथा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश प्रभारी जिल्हा आणि महिला बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले यांनी दिले. सूचना फलक लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

बालगृह, निरीक्षणगृह यासंदर्भात असलेल्या नियमांविषयी महिला बालविकास विभागाने औरंगाबाद जिल्हयातील सर्व संस्थांसाठी परिपत्रक जारी केले आहे. बालगृह, निरीक्षणगृह आणि शिशुगृहात काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली तसेच विधिसंघर्षग्रस्त मुले राहतात. या सर्व संस्थांमध्ये मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम, वाढदिवस व इतर वेळेनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. हे उपक्रम राबवताना बालगृहांकडून नियम व सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळले आहे. शहरातील एका बालगृहात १२ डिसेंबर रोजी झालेल्या उपक्रमाची बालमी मुलांच्या फोटोेसह प्रसिद्ध झाली, याकडे येंडोले यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...