आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:ग्राहकांच्या सोयीसाठी महामार्गावरील दुभाजक तोडले ; पेट्राेल पंप व्यावसायिकांवर कारवाई

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायाच्या सोयीसाठी व ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी महामार्गावरील दुभाजक तोडून कृत्रिम वळण तयार करणे व्यावसायिकांना चांगलेच महागात पडले. पाेलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी त्याची गंभीर दखल घेत अशा व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश देताच पंधरा व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते तयार करण्यात आले. महामार्गांचे नव्याने काम झाले. परंतु दोन लेनमधील दुभाजक तोडण्याचे प्रकार वारंवार समोर येत हाेते. ग्राहक वळवण्यासाठी, व्यवसायाच्या सोयीसाठी दुभाजक तोडून कृत्रिम वळण रस्ता तयार केल्याने अपघातांची संख्या वाढत होती. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माध्यमांतून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यात प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिक, पेट्रोल पंपचालक, फार्महाऊस मालक, वॉशिंग सेंटर मालकांचा समावेश आहे. पाच वर्षांपर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा या गुन्ह्यासाठी आहे. भविष्यातदेखील व्यावसायिक, नागरिकांनी परस्पर दुभाजक तोडल्यास गंभीर कारवाईचा इशारा कलवानिया यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील या लोकांवर दाखल झाले गुन्हे कन्नड परिसरात हॉटेल माउली, हॉटेल शिवराज, हॉटेल अशोक, हॉटेल आबाचा वाडा, हॉटेल श्रीमूर्ती, गर्जे फार्महाऊस, हदगाव वॉशिंग, खुलताबाद परिसरातील कसबाखेडा ते पळसवाडी या महामार्गावरील हॉटेल आम्रपाली, हॉटेल रोहिणी, गंगापूर परिसरातील हॉटेल बटरफ्लाय (जुने कायगाव), हॉटेल लोकसेवक, गांधी पेट्रोल पंप, हॉटेल जिजाऊ, गॅनोज कंपनी, एच.पी. पेट्रोल पंप, हॉटेल इंडियन ढाबा, पाचोड परिसरातील आडूळ बायपासजवळ माउली लॉन्ससमोर रजापूर, डाभरुळ गावाजवळ अज्ञात व्यक्तीविरोधात, करमाड परिसरातही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...