आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावी-बारावीच्या ज्या परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. त्या परीक्षा केंद्रांना २०२३ मध्ये परीक्षा केंद्र न देण्याचे मंडळाने म्हटले आहे. या केंद्रांकडून हमीपत्र घेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्विकारण्यात आले आहेत. नवीन केंद्रासाठी एकूण ५४ प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावी २०२२ च्या परीक्षेत निलजगाव येथील लक्ष्मीबाई टिळक, गेवराई तांडा येथील स्वप्नपूर्ती कॉलेज येथे परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना मंडप आणि गोडावूनमध्ये बसलवल्याचे आढळून आले होते. विद्यार्थी गैरसोय झाल्याने त्यांच्यावर कारवाई करत बोर्ड संकेतांक गोठविण्यात आला होता. परंतु विद्यार्थी हित लक्षात घेवून शिक्षण विभागाने मान्यता पूर्ववत केली. शिवाय बोर्डाने देखील संकेतांक खुला केला आहे. मात्र या संस्थांना परीक्षा केंद्र देण्यात येणार नाही.
ज्या शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्यांना केंद्र देण्यात येणार नसल्याचे सहसचिव प्रियाराणी पाटील यांनी सांगितले. यंदा २०२३ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ५४ जणांचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे आले आहेत. त्यापैकी ६ प्रस्ताव हे दहावीचे आणि ४८ प्रस्ताव हे बारावीसाठीचे आहेत.
या आलेल्या प्रस्तावांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता तदर्थसमिती समोर ठेवून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. मात्र, गेल्या वर्षी ज्या परीक्षेचे उपकेंद्र असणाऱ्या केंद्रावर गैर प्रकार आढळून आले आहेत. ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्या संस्थांना परीक्षेचे केंद्र दिले जाणार नाही. असे पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.