आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Divisional Commissioner Sunil Kendrakar's Instructions To Conduct Fire Audit And Electrical Safety Inspection Of Covid And Other Hospitals In Marathwada

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांच्या सुचना:मराठवाड्यात कोविड सोबतच इतर रुग्णालयांचे फायर ऑडीट अन विद्युत सुरक्षा तपासणी करण्याच्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सुचना

हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील कोविड सोबतच इतर रुग्णालयांचे फायर ऑडीट व विद्युत सुरक्षा तपासणी तातडीने करून घेण्याच्या सुचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व शासकिय रुग्णालयांना दिल्या आहेत. अग्नी सुरक्षेबाबत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मराठवाड्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोविड केअर सेंटर सुरु केले जात आहे. या शिवाय डेडीकेटेड कोविड सेंटर देखील सुुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, या संदर्भात आयुक्त केंद्रेकर यांनी आवश्‍यक सुचना दिल्या आहेत. रुग्णालयांमधून आगी सारख्या घटना घडू नये यासाठी फायर ऑडीट व विद्युत सुरक्षा तपासणी करावी. या शिवाय रुग्णालयाच्या परिसरातून अग्नीशमन दलाचे वाहन फिरेल एवढा रस्ता राहील याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे रस्ते नसतील त्या ठिकाणी असलेले अडथळे दुर करून घ्यावेत. तसेच रुग्णालयातून बाहेर जाण्याचा मार्ग तयार करून ठेवावा. त्याची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

या शिवाय रुग्णालयातील विज पुरवठा खंडीत झाल्यास त्या ठिकाणी जनरेटरची सुविधा उपलब्ध करूनठेवावी.

मराठवाड्यात ज्या रुग्णालयांवरून विज वाहिन्या गेल्या आहेत. त्यांची विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. सध्या ढगाळ वातावरण व विज कोसळणे यासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णालयातील लायटनींग अरेस्टरची सुविधा उपलब्ध देण्यात याव्यात.

या शिवाय मराठवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आॅक्सीजन काँन्स्ट्रेंटर खरेदीच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपलब्ध ऑक्सीजन काँन्स्ट्रेटर घेऊन त्यातून ५ ते ७ लिटर ऑक्सीजन रुग्णांना देता येणे शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वॉर्ड तयार करता येत असल्यास त्यानुसार वॉर्ड तयार करण्याच्या सुचनाही केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवा

कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व परिचर यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समुपदेशनांतर्गत कार्यक्रम घ्यावेत. तसेच रुग्ण दाखल होतांना त्यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना धीर देऊन सौदार्हपुर्ण वागणुक देण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...