आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धा:सुमित, रेणुका, राधिका, रामदेव प्रथमस्थानी; स्पर्धेत 200 खेळाडूंचा सहभाग

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा कार्यालय, औरंगाबाद जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेत सुमित रंधवे, आदित्य शिरोळे, रामदेव बिराजदार, ज्ञानेश्वरी धनवे, रेणुका डोके आणि राधिका सोनवणे या खेळाडूंनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबाद विभागाच्या संघात निवड झाली आहे.

धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या स्पर्धेत औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, बीड शहर, बीड ग्रामीण, जालना, परभणी जिल्ह्यातील 14,17 व 19 वयोगटातील 200 मुलेमुली खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, क्रीडा अधिकारी लता लोंढे, मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष मनाजी शिंदे, धर्मवीरचे प्राचार्य बाभुळगावकर, दिलीप गायके, राकेश खैरनार, जयाजी पवार, उदय कहाळेकर आणि दिलीप खोतकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख विनायक राऊत यांनी केले.

विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे : 14 वर्षे गट - सुमित रंधवे (प्रथम), ऋषी पठारे (द्वितीय), ओम भस्करे (तृतीय), विकास राठोड (चतुर्थ), दीपक उद्देश (राखीव).

17 वर्षे गट - आदित्य शिरोळे, सिद्धांत रणदिवे, राजेश डोके, दीपक अर्जुन, वेदांत रणदिवे.

19 वर्षे गट - रामदेव बिराजदार, विशाल मनगटे, शिवम काकडे, विवेक पवार, करण हरकळ.

14 वर्षे संघ - ज्ञानेश्वरी धनवे, स्वरा जोशी, कार्तिकी केत, धनश्री शिंदे, लावण्या सूर्यवंशी. 17 वर्षे गट - रेणुका डोके, अदिती पठाडे, रिद्धी मुंदडा, प्रतीक्षा डोके, पुष्करणी वझे.

19 वर्षे गट - राधिका सोनवणे, योगिता डुरे, श्रुती गायकवाड, दिव्या जाधव, प्राची साखरे.

बातम्या आणखी आहेत...